वेध माझा ऑनलाइन । लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील(तात्या) यांच्या संकल्पनेतुन "पुस्तकांची बाग एक वाचन चळवळ" हा उपक्रम कराड शहरातील टाऊन हॉल येथे सुरू आहे त्याठिकाणी अनेक मान्यवरांनी आजपर्यंत भेटी देऊन या उपक्रमाचे कौतुकहो केले आहे आज या पुस्तकांच्या बागेला स्टार प्रवाह मराठी वहिनीवरील मुरंबा मालिकेत रमाची भूमिका साकारणाऱ्या कराडच्या अभिनेत्री शिवानी (राही) मुंढेकर हिने सदिच्छा भेट दिली तिचे डॉ सौ तेजस्विनी सौरभ पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले
यावेळी श्री तानाजी नलावडे(सर), अक्षरगुरू श्री राहुल पुरोहित(सर), श्री रविंद्र मुंढेकर, श्री सतीश भोंगाळे, श्री राकेश शहा, श्री मंगेश वास्के, श्री भारत थोरवडे, श्री सुधाकर गायकवाड, श्री गणेश हिंगमीरे, ग्रंथपाल श्री संजय शिंदे , श्री प्रताप भोसले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉ
सौ तेजस्वीनी पाटील यांनी पुस्तकांच्या बागेची सविस्तर माहिती दिली
कु शिवानी रविंद्र मुंढेकर ही अभिनेत्री मूळची कराडची आहे स्टार प्रवाहवर सुरू असलेल्या 'मुरांबा' या मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरांत ती पोचली आहे. सध्या ती सुट्टीनिमित्त कराडमध्ये असून "पुस्तकांची बाग या उपक्रमाविषयी माहिती मिळाली असता तिने याठिकाणी भेट दिली.
हल्ली मुलांचा बराचसा वेळ स्क्रीन टाइम मध्ये जातो यापासून त्यांना परावृत्त करून वाचनाची गोडी लागावी, वाचन चळवळ वाढावी अशी अपेक्ष्या व्यक्त करत हा उपक्रम मनापासून आवडला असल्याची प्रतिक्रिया अभिनेत्री शिवानी मुंढेकर हिने दिली हा उपक्रम राबविल्याबद्दल तिने सौरभतात्यांचे अभिनंदनही केले
यावेळी शिवानी मुंढेकर हिचे नातेवाईक, विद्यार्थी पालक, ग्रंथालय विभाग कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment