वेध माझा ऑनलाइन । मलकापूर तालुका कराड गावच्या हद्दीत पुणे-बंगळूर महामार्गावर कंटेनरने धडक दिल्याने पादचारी महिला जागीच ठार झाली. मंगळवार दिनांक 13 रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव समजू शकले नाही.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर कोल्हापूर सातारा लेनवरती कंटेनर (क्रमांक एम एच 11 बी एल 63 79) ची महामार्ग ओलांडणाऱ्या महिलेला धडक बसली. या धडकेत संबंधित पादचारी महिला जागीच ठार झाली.
No comments:
Post a Comment