दरम्यान, याबाबत येणाऱ्या पाणीपट्टी बिलात कराडच्या जनतेसाठी शहरातील राष्ट्रवादीने 15 टक्के कपात द्या अशी मागणी केली होती... कॉंग्रेसने 25 टक्के कपातिची मागणी केली होती तर राजेंद्रसिंह यादव यांनी 50 टक्के कपात करा... अशी मागणी केली होती... पाणी बिलात कपात करा नाहीतर पूर्वीप्रमाणेच पाणीपट्टी बिलाची आकारणी करा अशी दुसरीही मागणी त्याचवेळी या सर्वांनीच केली होती... इंद्रजीत गुजर यांनी देखील पूर्वीच्याच दरात पाणीपट्टीची मागणी केली होती...शहरातील शिंदे गट, मनसे तसेच दक्ष कराडकर प्रमोद पाटील यांनाही हीच मागणी लावून धरली होती... दरम्यान आज जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशामुळे या सर्वांच्या मागणीला यश आल्याची चर्चा कराडात सुरू आहे
काही महिन्यांपूर्वी कराडचा पाणीप्रश्न चांगलाच पेटला होता 24 तास पाणी शहराला देणार या चर्चेने अनेक वर्षे रखडलेली शहराची 24 तास पाणीपुरवठा स्कीम सपशेल फेल गेली असताना देखील दुसरीकडे त्याच्या नावाखाली बसवलेल्या फौल्टी मीटर बाबत गावातून तक्रारी येऊन हा विषय चिघळला होता... शहराला 24 तास पाणी मिळायचं राहीलं बाजूला पण त्या मीटर मधून येणाऱ्या हवेमुळे भरमसाठ बिल येतंय अशा तक्रारी गावात वाढल्या होत्या...तर काही ठिकाणी 9 -9महिने बिलच आले नाही अशी या पाणीपट्टी बिलाची बोंब उठली होती... आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने शहरातील पाणी पेटल्याची स्थिती गावात निर्माण झाली होती
दरम्यान, आज सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी कराडच्या पाणी प्रश्नावर पूर्वीच्याच पद्धतीने पाणीपट्टी आकारणी करण्याबाबतचे आदेश जारी केले आहेत त्यामुळे याबाबत शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिंदे गट,मनसे, राजेंद्रसिंह यादव गट सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील, इंद्रजित गुजर या सर्वांच्या मागणीला एकप्रकारे यश आल्याची भावना कराडकरांमध्ये आहे
No comments:
Post a Comment