वेध माझा ऑनलाइन । लोकनेते बाळासाहेब देसाई हे मोठे नेते होते त्यांचे व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते दुसऱ्या पक्षात असूनही ते नेहमी मराठी माणसाच्या लढ्यात सहभागी झाले त्यांच्या नातवाने मात्र शेण खाल्ले गद्दारी केली अशी टीका संजय राऊत यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर केली ते आज कराड येथे पत्रकारांशी बोलत होते त्यानी आज कराडात येवून पत्रकारांच्या विविध विषयांवरील प्रश्नांची आपल्या हटके स्टाईलने रोखठोक उत्तरे दिली
ते म्हणाले प्रकाश आंबेडकरांशी अजून आमची युती झालेली नाही त्यांच्या औरंगजेबाच्या कवरीवर जाण्याचे समर्थन होऊ शकत नाही पण याचे उत्तर पत्रकारांनी फडणवीसांनाही विचारले पाहिजे ते सत्ताधारी आहेत ना? हिंदुत्वाचा त्यांच्याकडे ठेका आहे ना?ते आणि शिंदे मागच्या वेळी म्हटले होते ती कबर उखडून टाकू... मग आता तुमची सत्ता आहे वाट कसली बघताय उखडून टाका ना जेसीबी आम्ही देऊ भाजपने ढोंग करू नये असा उलट टोलाही त्यांनी लगावला
मेहबुबा मुफ्ती व उद्धव ठाकरे एका बैठकीत एकत्र कसे दिसले ?या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले मुफ्ती मुख्यमंत्री होत्या त्यांच्या शपथविधीला मोदी अमित शहा देखील त्यांच्या समवेत नव्हतें का? अगोदर हा प्रश्न त्यांना विचारा महाविकास आघाडीमध्ये जो जो ज्या ठिकाणी निवडून येण्याची क्षमता बाळगतो तीथे त्या त्या पक्षाचा उमेदवार उभा राहणार असे सांगून महाविकास आघाडी एकत्रपणे येणाऱ्या निवडणूका लढेल असेही ते म्हणाले तसेच भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी महाविकास आघाडी सर्व प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले राज्याला भाडोत्री व गद्दार मुख्यमंत्री मिळाला असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली
No comments:
Post a Comment