Friday, June 9, 2023

भाजपने दिला इशारा ; मलकापूरचा पेटलेला कचरा डेपो प्रशासनाने लग्गेच विझवला ! ;

वेध माझा ऑनलाइन । मलकापूरच्या कचरा डेपोल लावण्यात येणार्‍या आगी संदर्भात भारतीय जनता पक्षाने आवाज उठवल्यानंतर पेटलेला डेपो नगरपरिषद प्रशासनाने लग्गेच विझवला आहे. 

 मलकापूर शहराच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाजवळ असणार्‍या कचर्‍यापासुन खतनिर्मिती प्रकल्पातील  संकलित कचरा पेटवण्याच्या घटनेवरुन मुख्याधिकारी राहूल मर्ढेकर यांना भाजपा नेते डाॅ.अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका उपाध्यक्ष तानाजी देशमुख यांनी निवेदन दिले होते आणि याप्रश्नी ताबडतोब कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला होता.याची लग्गेच दखल घेत मलकापूर प्रशासनाने सदर आग विझवली असुन यापुढे अशा घटना घडू नये यासाठी ठोस उपाययोजना करणार असल्याचे मुख्याधिकार्‍यांनी यावेळी सांगितले 

No comments:

Post a Comment