वेध माझा ऑनलाइन । एकनाथ शिंदे व 50 आमदार हे वाघ आहेत, या वाघांनी उठावं केला तेव्हा कुठे भाजपच्या लोकांना मंत्रिमंडळात स्थान मिळालंय.. या मुख्यमंत्र्यांची ताकद आणि वाहवा पाचविण्याची हिम्मत भाजपच्या लोकांनी ठेवायला पाहिजे. त्यांना त्यांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर 1987 ला भाजपचे फक्त दोनच खासदार होते. आज ते पण हत्ती झाले आहेत.. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जर असं भाजपचे मंत्री बोलत असतील तर त्यांच्या वरिष्ठांनी लक्ष घातलं पाहिजे. ठाण्याविषयी बोलताना तुम्ही किती होते...? कुणाच्या संगतीने महाराष्ट्रात आले ..? याचा सुद्धा भाजपाने विचार करायला पाहिजे.. भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांच्यासारख्यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना तारतम्य बाळगले पाहिजे, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आ. संजय गायकवाड यांनी दिली आहे.. भाजपने आपल्या औकातीत रहावे.. असा इशाराही यावेळी गायकवाड यांनी दिलाय त्यामुळे एकूणच शिंदे गट व भाजपमध्ये चांगलीच जुंपली असल्याचे सध्या चित्र आहे
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी राज्यातील लोकांची एक नंबरची पसंती असल्याची जाहिरात काही दैनिकातून प्रसिद्ध झाली होती त्यानंतर भाजपच्या एका नेत्यांने एकनाथ शिंदेंची तुलना बेडकाशी करत तो कीतीही फुगला तरी हत्ती होत नाही असं वक्तव्य करत टीका केली होती त्याचवेळी या दोन गटात ठिणगी पडणार हे स्पष्ट झाले होते आज शिंदे गटाचे आ संजय गायकवाड यांनी भाजप वर टीका करताना एकनाथ शिंदे वाघ आहेत त्यांनी उठाव केल्यामुळे भाजप चे लोक मंत्रिपद मिळवू शकले असे म्हणत या मुख्यमंत्र्यांची ताकद आणि वाहवा पाचविण्याची हिम्मत भाजपच्या लोकांनी ठेवायला पाहिजे. त्यांना त्यांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर 1987 ला भाजपचे फक्त दोनच खासदार होते. आज ते पण हत्ती झाले आहेत.. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जर असं भाजपचे मंत्री बोलत असतील तर त्यांच्या वरिष्ठांनी लक्ष घातलं पाहिजे. ठाण्याविषयी बोलताना तुम्ही किती होते...? कुणाच्या संगतीने महाराष्ट्रात आले ..? याचा सुद्धा भाजपाने विचार करायला पाहिजे.. अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आ. संजय गायकवाड यांनी दिली आहे.. भाजपने आपल्या औकातीत रहावे.. असा इशाराही यावेळी गायकवाड यांनी दिलाय
No comments:
Post a Comment