Wednesday, June 14, 2023

शंभूराज देसाई हरवले असल्याचे बॅनर झळकले ; राज्यात चर्चेचा धुमाकूळ !

वेध माझा ऑनलाइन । ठाण्याचे पालकमंत्री ना शंभूराज देसाई यांचे ठाणे जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष नाही असे आरोप होत असतानाच... आता नवीन बातमी समोर आली आहे ... ठाण्याचे पालकमंत्री असलेले ना शंभूराज देसाई हरवले आहेत... आपण याना पाहिलंत का...असे बॅनर ठाण्यात लागले आहेत त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे

शंभूराज देसाई यांचे मीरा भाईंदर येथील वाढत्या गुन्हेगारी कडे लक्ष आहे का?असा सवाल करत ही बॅनरबाजी झाली आहे त्यामुळे ठाणेकर सरकारवर नाराज असल्याचीही यानिमित्ताने चर्चा आहे मनसेच्या वतीने हे बोर्ड लावले असल्याची देखील चर्चा आहे पालकमंत्री गायब झाले आहेत, हरवले आहेत असे बॅनर लागल्याने झालेल्या चर्चेने राज्यभर धुमाकूळ घातला आहे भर चौकात हे फलक लावले आहेत

No comments:

Post a Comment