वेध माझा ऑनलाइन . भेटीलागी जिवा लागलीसे आस … असे म्हणतच जणू वारकरी पंढरपूरच्या दिशेने पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी मार्गस्थ होत आहेत. पायी चाललेल्या वारीचे जेव्हा सातारा जिल्ह्याच्या सीमेवर आगमन होताच लोणंद येथे जिल्हाधिकारी , जिल्हापोलिस प्रमुख यांच्याकडून स्वागत करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी वारकऱ्याची वेशभूषा तर त्यांच्या पत्निने देखील पारंपरिक वेशभूषा साकारली होती . हा पारंपरिक वेशभूषेतील त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे .
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्ये ते धोतर नेसून तर त्याच्या पत्नी नऊवारी साडी नेसून वारीमध्ये सहभागी झाल्याचे दिसत आहे. याबाबत माणुसकीच हा खरा धर्म असल्याचे मत यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी "द पिलर' च्या माध्यम प्रतिनिधींशी शी बोलताना व्यक्त केले . त्याचबरोबर सेवा हेच आमचे कर्तव्य असून आम्ही कर्तव्याला प्राधान्य देतो असे देखील ते यावेळी म्हणाले . आमच्या घरांमधून आम्हाला लहानपणापासून कर्तव्याला प्राधान्य देण्याचीच शिकवण मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले .
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन या वारीमधून होत असते वारीमध्ये जातीभेद , धर्मभेद नसतो तर सर्वच विठ्ठलाचे वारकरी म्हणून वारीत सहभागी झालेले असतात या वारीचा आनंद घेण्याचा मोह पोलीस जिल्हा प्रमुख शेख यांना देखील आवरता आला नाही . या पालखीमध्ये पत्नीबरोबर पायी चालत काही काळ ते सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले . शेख यांनी त्यांच्या कृतीतून सामाजिक एकतेचा संदेश दिल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
No comments:
Post a Comment