Thursday, June 22, 2023

फडणवीस कराडात येऊन म्हणाले...अतुल भोसले कराड दक्षिणचे आमदार होणार ...आणि म्हणाले... या जिल्ह्याचा खासदार भाजपचा होणार...उदयनराजेच होणार...असे का म्हटले नाहीत... काय आहे फडणवीसांच्या मनात ?

वेध माझा ऑनलाइन। सातारा जिल्ह्याचा खासदार हा भाजपचाच असेल... आणि कराड दक्षिण चे आमदार डॉ अतुलबाबाच होणार... अशा भाषेत राज्याचे उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनी आज कराड येथील कल्याणी मैदान येथे भाजपच्या झालेल्या जाहीर सभेत स्पष्टपणे सांगितले.. मात्र जिल्ह्याचे खासदार कोण होणार याबाबत त्यांनी उदयनराजे यांचे नाव घेतले नाही...साताऱ्याचे खासदार भाजपचाच होणार ..एवढंच ते बोलले... खरतर त्यांनी जसा अतुलबाबांचे नाव घेत कराड दक्षिणचे भावी आमदार म्हणून उल्लेख केला... तसा भाजपचे भावी खासदार म्हणून उदयनराजे यांचे नाव घेणे अपेक्षित होते...मात्र तसे झाले नाही... म्हणूनच उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीबाबत पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप काय निर्णय घेणार ? फडणवीसांच्या मनात नेमकं काय चालले आहे ? अशा चर्चा आता यानिमित्ताने सुरू झाल्या आहेत

मागील विधानसभा निवडणुकीत अतुल भोसले हे माजी मुख्यमंत्र्यासमोर मोठ्या ताकदीने लढले  मात्र हेच तरुण तडफदार आणि देखणं व्यक्तिमत्त्व यावेळी नक्की आमदार होणार असे गौरवोद्गार फडणवीस यांनी यावेळी आवर्जून काढले... त्याचवेळी सातारा जील्ह्याचे खासदार भाजपचाच होणार एवढंच ते म्हणाले... यावेळी अतुलबाबा आमदार होणार असे ठामपणे ते  म्हणाले तसे... उदयनराजे खासदार होणार असेही त्यांना म्हणता आले असते...मात्र ते म्हणाले नाहीत... 

दरम्यान , यावेळी देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वसामान्यांना विकासाचे भागीदार केले आहे. गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला आहे. मोदी अमेरिकेत गेले असताना महाराष्ट्रातील एक नेते, त्यांनी अमेरिकेऐवजी मणिपूरला जायला हवे होते, असे म्हणतात. परंतु त्यांना आमचे सांगणे आहे की, मणिपूर सांभाळायला आमचे गृहमंत्री अमित शहा पुरेसे आहेत. मोदींनी जाण्याची आवश्यकता नाही. मात्र तुम्ही मातोश्रीपासून वरळीपर्यंत गेला नाहीत. तुम्हाला मोदींवर बोलण्याचा अधिकार नाही. मोदींनी देशात कोविडची लस तयार केली, असे मी म्हणालो होतो. ते उद्धव ठाकरे यांना झोंबले. मग उद्धव ठाकरे राज्य चालवतो असे म्हणतात. ते काय घोडय़ावर बसून घोडा हाकत होते का? लस मोदींनीच लस तयार केली. कारण या लसीचे रॉ मटेरियल पाच देशांकडे होते. तेथे जाऊन 1800 कोटी देऊन रॉ मटेरियल उपलब्ध केले. ही लस तयार केल्यानंतर कित्येकांना ही मोफत लस उपलब्ध करून दिली. लस मिळाली नसती तर देशात आज काय परिस्थिती असती. मोदी सरकारने हिमतीने निर्णय घेतल्याने साखर कारखाने जिवंत राहिले. इथेनॉल पॉलिसी आणल्याने कारखानदारी आणि शेतकरी वाचला. आता शासन शेतकऱयांना 1 रूपयांत पीक विमा देणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत शेतकऱयांना 12 तास वीज देण्यात येणार आहे. आम्ही 2014 साली सत्तेवर आलो. त्यावेळी महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आणला होता. मध्यंतरीच्या तीन वर्षात तो पुन्हा मागे गेला. आता गेल्या वर्षभरात आम्ही व एकनाथ शिंदे मिळून महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. 2019 साली आम्ही सत्तेवर असताना जिल्हय़ातील सिंचन योजना या स्टेजवर होत्या, त्यावर मागच्या सरकारने काहीच केलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत 150 देशाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत योगदिन साजरा केला. संपूर्ण जगाने मोदींच्या नेतृत्वाखाली योग स्वीकारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला असून नवी कार्यसंस्कृती रूजवली आहे. 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या हातात सत्ता आली तर देश गती आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांचे काम घराघरापर्यंत पोहोचवले तर 2024 सालच्या सातारा लोकसभा निवडणुकीत भाजपचाच खासदार असेल. त्याचबरोबर कराड दक्षिणचा आमदारही भाजपचाच असेल. अतुल भोसले यांना 2014 साली आम्ही तत्कालीन मुख्यमंत्र्यांसमोर ढकलले. त्यांनी हिमतीने निवडणूक लढवली. यावेळी दक्षिणच्या जनतेने अतुलबाबांना निवडून देण्याचा निर्णय घेतला आहे असेही ते म्हणाले...



No comments:

Post a Comment