Saturday, June 10, 2023

बेकायदा पिस्तुल बाळगल्या प्रकरणी एकाला अटक ; कराड पोलिसांची मोठी कारवाई ;

वेध माझा ऑनलाइन । 
एकास बेकायदा पिस्टल बाळगल्या प्रकरणी  कराड पोलिसांनी स्टॅन्ड नजीक असणाऱ्या हॉटेल कृष्णा पॅलेस परिसरात आज सायंकाळच्या सुमारास अटक केली आहे

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शंकर बदु जाधव रा.वाघेश्वर मसुर ता. कराड, त्याचेकडे बेकायदा बाळगलेले पिस्टल  कराड येथील हॉटेल कृष्णा पॅलेस परिसरात विक्रीकरीता
येणार असल्याची माहिती पोलिसांना समजली.
पोलीस पथकाने त्या ठिकाणी दोन टिम तयार करुन सापळा रचला, संशयित इसमाकडे त्याचे पॅन्टचे कमरपट्टी पाठीमागील बाजुस एक पिस्टल व त्याचे मॅग्झिनमध्ये एक जिवंत राऊंड पोलिसांना सापडले त्या पिस्टलची किंमत अंदाजे ५०,०००/- इतकी आहे ते पिस्तुल पोलिसांनी जप्त केले आहे.या घटनेबाबत कराड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे


No comments:

Post a Comment