Friday, June 9, 2023

धमकी प्रकरणावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया ; काय म्हणाले पोलिसांना...;

वेध माझा ऑनलाइन । राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेत तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे या स्वत: जाऊन पोलिसांना भेटल्या आहेत. जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलवर कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

यासर्व प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दखल घेतली आहे. हे सर्व प्रकार राज्यात खपवून घेतले जाणार नसल्याचा इशाराही फडणवीसांनी दिला आहे.

दरम्यान धमकी प्रकरणावर शरद पवारांनीही प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही प्रश्नावर मत देण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे . कुणी धमक्या देऊन आवाज बंद करू शकेल, असं वाटत असेल तर त्यांचा हा गैरसमज आहे. महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्थेचा यंत्रणा आहे, त्या पोलीस दलावर माझा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे त्याची चिंता मी करत नाही. पण त्याचबरोबर ज्यांच्या हातात राज्याची सूत्र आहेत, त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही.

No comments:

Post a Comment