वेध माझा ऑनलाइन । पुणे-बेंगलोर महामार्गावर कराड नजीक सलग दुसऱ्या दिवशी आणखी एक जीव गेला आहे. पाटण तिकाटणे येथे डंपरने दूचाकीस धडक दिल्याने दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. तर दुचाकीवर असणारी एक महिला जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी वाहतूक शाखा, कराड शहर पोलीस स्टेशन अपघात विभागाचे कर्मचारी दाखल झाले आहेत.
नम्रता दादासो चावरे (23) ही महिला जखमी झाली असुनय जयदीप जयसिंग खडे (28) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. खुडे हा साळशिरंबे (खूडेवाडी) येथिल रहिवासी आहे.
पाटण तिकाटण्यातून कराड बाजूकडे जाणाऱ्या रोडवर डंपरने दुचाकीला धडक दिल्याची घटना सहा वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी वर दोघे जात असताना हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी दर्शीने सांगितले. संबंधित दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला असून जखमी महिलेस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment