Saturday, June 10, 2023

सुप्रिया सुळे व प्रफुल पटेल या दोन राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षांची घोषणा शरद पवारांनी केली तेव्हा अजित पवार स्टेजवर मान खाली घालून बसले होते...

वेध माझा ऑनलाइन । राष्ट्रवादी काँग्रेसच्या 24 व्या वर्धापन दिनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली आहे.  याशिवाय सुनिल तटकरे यांनाही पक्षाचे सरचिटणीस केलं आहे. मध्यप्रेदश, गुजरात, राजस्थान, झारखंडची जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे तर महाराष्ट्र, हरयाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.दरम्यान, अजित पवार यांच्यावर कोणतीच जबाबदारी सोपवली नसल्याने त्याची चर्चा सध्या रंगली आहे.

सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली तेव्हा अजित पवार कार्यक्रमाच्या स्टेजवरच उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या दोन कार्यकारी अध्यक्षांची घोषणा शरद पवारांनी केली तेव्हा अजित पवार स्टेजवर मान खाली घालून बसले होते. घोषणा झाल्यानंतर अजित पवारांनी टाळ्या वाजवल्या. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

No comments:

Post a Comment