Sunday, June 11, 2023
शरद पवारांना धमकी देणारा अखेर अटकेत ; कोण आहे हा आरोपी? कुठला आहे? काय करतो? वाचा बातमी...
वेध माझा ऑनलाइन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फेसबुकवर धमकी दिल्याच्या आरोपावरून गुन्हे शाखेने रविवारी पुण्यातील ३४ वर्षीय आयटी इंजिनिअरला अटक केली. सागर बर्वे असे आरोपीचे नाव असून त्याला रविवारी न्यायालयात हजर केले असता १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी फेसबुक आणि ट्विटरसह सोशल मीडियावर जीवे मारण्याच्या धमक्या आल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या अगोदर शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप हा अमरावतीतील भाजप कार्यकर्त्यावर ठेवण्यात आला होता. सौरभ पिंपळकर नावाच्या तरूणाने ट्विटरवरुन पवारांना धमकी दिली, असा आरोप केला गेला होता, पोलीस तपास करत होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment