Monday, June 12, 2023

कराडामध्ये लिंगायत समाजातील १० वी व १२ वीत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थी, विद्यार्थीनींचा कौतुक सोहळा उत्साहात ;

वेध माझा ऑनलाइन । कराड शहर व पंचक्रोशीतील वीरशैव लिंगायत समाजामार्फत गेल्या चार वर्षापासून वीरशैव लिंगायत समाजातील १० वी व १२ वी च्या व क्षैक्षणीक क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठी मार्गदर्शन व कौतुक सोहळा रविवार दिनांक ११ जून रोजी सायंकाळी ५:०० वाजता पेठ रविवार लिंगायत मठ येथे मोठया दिमाखात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. श्री. राहुल खडके, प्रा. सौ. वनिता भादुले, प्रा. सौ. उमा हिंगमिरे, प्रा. श्री. अशोक सदावरे, प्रा. सौ. भाग्यश्री देशमाने, व प्रा. सौ. सीमा पाटील हे उपस्थित राहून या मान्यवरांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. १० वी व १२ वी नंतर विद्यार्थ्यांने कोणती साईड निवडावी व आताच्या विद्यार्थी-विद्यार्थीनीने मोबाईल पासून लांब राहिले पाहिजे. मोबाईलचा वापर फक्त शैक्षणिक कामी केला पाहिजे असे प्रबोधन यावेळी करण्यात आले. सर्व प्रमुख पाहुण्यांनी आयोजकांचे आभार मानले.

कराड शहर व पंचक्रोशीतील वीरशैव लिंगायत समाजातील सन २०२२ २०२३ सालामधील १० वी व १२ वी च्या क्षैक्षणीक क्षेत्रात यावर्षी प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनीसाठी मार्गदर्शन व कौतुक सोहळ्याच्या या कार्यक्रमाचे आयोजन संयोजक श्री. दत्तात्रय तारळेकर, श्री. सतिश बेडके, श्री. उदय हिंगमिरे, श्री रविंद्र मुंढेकर, श्री. राजेंद्र भादुले व श्री राजीव खलिपे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. दत्तात्रय तारळेकर यांनी केले व आभार श्री. धनजंय विभुते यांनी मानले या कार्यक्रमाच्यावेळी श्री. मिलींद लखापती यांनी विद्यार्थ्यांसाठी वहयांचे वाटप केले व श्री. संभाजी फल्ले यांनी नाष्टा व चहापाणीची सोय केली.


No comments:

Post a Comment