Tuesday, June 13, 2023

मोटारसायकल चोर सापडले ; गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई ; किती मोटारसायकली चोरल्याची चोरट्यांनी दिली कबुली ?

वेध माझा ऑनलाइन । कराड शहरामध्ये  पोलीस अधीक्षक समीर शेख ,अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर व उपविभागीय पोलीस अधिकारी कराड अमोल ठाकूर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काल रात्री दहा ते बारा दरम्यान पेट्रोलिंग व नाकाबंदी केली होती या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक श्री डांगे यांच्यासह पोलीस पथक कराड शहरात पेट्रोलिंग करत असताना दोन इसम संशयितरित्या मोटरसायकल वरून फिरत असतानाचे त्यांना आढळले. त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली त्यांना पोलीस ठाण्यात आणून विचारपूस केली असता त्यांनी 11जूनला गाडी चोरल्यची माहिती दिली शिवाय आणखी पाच मोटरसायकली चोरल्याची कबुली देखील दिली त्यातील चार मोटारसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून एक गाडी तळबीड पोलीस स्टेशन येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे 

No comments:

Post a Comment