Friday, June 16, 2023

गाडी सिग्नलला थांबली, सदाभाऊ खोत रस्त्यावर पचकन थुंकले ; टी व्ही चॅनेलच्या कॅमेरात दृश्य कैद ;

 वेध माझा ऑनलाइन । लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांना स्वच्छता पाळण्याचे आणि स्वच्छता राखण्याचे संदेश देतात. पण स्वतः मात्र त्याचं पालन करत नाहीत. सदाभाऊ खोत यांनीही तेच केलं. एका न्यूज चॅनेलच्या कॅमेऱ्यात सदाभाऊ खोत गाडीचा दरवाजा खोलून थुंकताना दिसले. ते ही एकदा नाही तर दोन वेळा. ही दृश्य कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर एकच प्रश्न विचारावा वाटतो. सदाभाऊ तुम्हाला हे शोभतं का?

दक्षिण मुंबईत सिग्नलवर सदाभाऊंची इनोवा गाडी थांबली आणि सदाभाऊं गाडीचा दरवाजा उघडून दोनदा रस्त्यावर थुंकले. राज्याच्या एका माजी मंत्र्याने आणि लोकप्रतिनिधीने हे असं वागलं तर सर्वसामान्यांनी काय करायचं असा सवाल उपस्थित होतोय. 
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत योजना सुरू केली, तर दुसरीकडे त्यांच्याच सहकारी पक्षाच्या नेत्याने रस्त्यावर थुंकून या योजनेचा बोजवारा उडवल्याचं चित्र आहे. नागरिकांनी रस्त्यावर थुंकू नये म्हणून राज्य सरकार मोहीम राबवतं, त्या-त्या ठिकाणचे प्रशासन स्वच्छतेचे संदेश देत नागरिकांनी असं करू नये यासाठी प्रयत्न करते. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास आर्थिक दंडाचीही तरतूद आहे. सर्वसामान्यांकडून हा दंड वसूल केला जातो. आता राज्याच्या माजी मंत्र्याने रस्त्यावर थुंकून नियमांची पायमल्ली केली केल्याचं दिसून आलं. रस्त्यावर थुंकण्याच्या या प्रकारानंतर सोशल मीडियातून त्यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment