आज जनता बझार ची पंचवार्षिक निवडणूक पार पडली विलासराव वाठारकर पॅनल विरुद्ध सहकार पॅनेल अशी थेट लढत पार पडली वाठारकर पॅनल चे नेतृत्व राजेश पाटील यांनी केलं तर सहकार पॅनल चे नेतृत्त्व अनिल खुंटाळे यांनी केलं काही दिवसाच्या प्रचार प्रक्रियेनंतर ही निवडणूक आज पार पडली दोन्ही पॅनल प्रमुखांनी मतदारांशी थेट संपर्क ठेवला होता सहकार पॅनल मधून 6 उमेदवार उभे होते तर वाठारकर पॅनल मधून 10 जणांची उमेदवारी होती एकूण मतदान 3799 इतके असताना केवळ 31 टक्के म्हणजे 1178 एवढे मतदानच या निवडणुकीकरिता झाले दरम्यान वाठारकर गटाचे यापूर्वी 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत त्यामुळे सर्वसाधारण गटाच्या उर्वरित जागेसाठी ही निवडणूक पार पडली
त्यामुळे निकाल कोणाच्या बाजूने लागतो याकडे कराडकर लक्ष ठेवून आहेत शिवाजी हायस्कुल येथे आजच सायंकाळी 6 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि रात्री 9 पर्यंत या निवडणुकीचा निकालही लागण्याची शक्यता आहे
No comments:
Post a Comment