Wednesday, June 21, 2023

साताऱ्यात राडा ; सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन इमारतीच्या उद्धाटनाची दोन्ही राजेंनी मारली "कुदळ' ; समर्थकांची घोषणाबाजी ;

वेध माझा ऑनलाइन । खासदार उदयनराजे भाेसले यांच्या विराेध झुगारुन सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन आज (बुधवार) आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी खिंडवाडी येथे केले. त्यानंतर आमदार भाेसले हे त्यांच्या नियाेजीत कार्यक्रमास निघून केले. आमदार भाेसले घटनास्थळावरुन जाताच खासदार उदयनराजे भाेसले यांनी त्याच ठिकाणी विविध विकासकामांचे भूमिपूजन करताच त्यांच्या समर्थकांनी घाेषणाबाजी केली. 

सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन इमारतीची जागा माझी आहे असे म्हणत आज खासदार उदयनराजे भाेसले यांनी न्यायालयाचा अवमान हाेऊ नये याची खबरदारी पाेलिसांनी घ्यावी असे आवाहन पाेलिसांना करत खिंडवाडीत भूमिपूजनाच्या ठिकाणी थांबून राहिले. दरम्यानच्या काळात शिवेंद्रसिंहराजे घटनास्थळी पाेहचले. त्यांनी जागा मार्केट कमिटीच्या नावावर असल्याचे सांगत उदयनराजे आणि पाेलिसांच्या उपस्थित कार्यक्रमस्थळी नारळ फाेडत नूतन इमारतीच्या भूमिपूजनाचा साेहळा पार पाडला आणि निघून गेले.

यानंतर खासदार उदयनराजे भाेसले यांनी घटनास्थळी त्यांच्या समर्थकांसमवेत विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. त्यानंतर उदयनराजे भाेसले म्हणाले संभाजीनगर ग्रामपंचायतमधील ग्रामस्थांना विविध विकासकामांसाठी जागा नाही. त्यासाठी त्यांनी आम्हांला या जागेची मागणी केली. आज या जागेत संभाजीनगर ग्रामपंचायतीसाठीच्या विविध विकासकामांसाठीचे भूमिपूजन केले.


No comments:

Post a Comment