वेध माझा ऑनलाईन । आज मनसे साधन सुविधा विभागाचा पाचवा वर्धापन दिन झाला. या कार्यक्रमासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी मुंबईतील नद्यावरुन तसेच या वर्षी पावसाळ्यात दरडी कोसळण्याची भीती व्यक्त केली. यावर त्यांनी कार्यकर्त्यांना तयार राहण्याचा सल्ला दिली. प्रशासनाच्या साधन सुविधेवरुनही ठाकरे यांनी सरकारला सुनावलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, या सगळ्या विंग आपण पक्षामध्ये वेगवेगळ्या शाखा सुरू केल्या. आपत्कालीन व्यवस्थापन पथकही स्थापन केले. या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणून मी ब्लू प्रिंट आणली होती. तो या सगळ्या योजनांचा भाग होता. समाजामधील वेगवेगळ्या प्रश्नांवर काम करणे गरजेचे आहे. आपण अग्निशमन दलाच कौतुक केलं पाहिजे. 'प्रत्येकवेळी कामाला मनसेला धावून येते, मदत मागायला येता, मतदानाला का येत नाही? असा परखड सवाल राज ठाकरेंनी यावेळी केला.
राज ठाकरे म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीत मनसेच मदतीला येते. कोकणात यंदा मोठी गरज लागेल. दरडी कोसळु शकतात. मुंबईत नाले तुंबतायत कशाला, कोणामुळे तुंबतायत याचा सोध गेतला पाहिजे. राज्याच्या बाहेरचे लोक येणार, नद्या-नाल्यांच्या बाजुने बसणार, झोपड्या उभारणार. मुंबईत तीन नद्या होत्या. त्यापैकी मिठी नदी राहिली आहे. पण तुम्हाला माहितीय का, मुंबईत पाच नद्या होत्या. त्यापैकी चार मारून टाकल्या, मुंबईला पाईपलाईनच्या बाजुला कित्येक हजारो झोपड्या आहेत. कारण पालिकेचे लक्ष नाही, आमदारांचे नाही, मतासाठी सगळे चालते, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.
No comments:
Post a Comment