Friday, June 9, 2023

कोयना सहकारी वाहतूक कामगार संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

वेध माझा ऑनलाइन । माजी सहकार मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस जि. प. सदस्य अॅड उदयसिंह पाटील उंडाळकर संस्थापक असलेल्या कोयना सहकारी वाहतूक कामगार संस्था मर्यादित कराडची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली

2022 - 23 ते 2026- 27 या नवीन सालासाठी निवडलेल्या संचालक मंडळात विद्यमान चेअरमन तुकाराम राजाराम पाटील ( साळशिरंबे )यांचा समावेश असून अन्य संचालकांमध्ये विजयसिंह मानसिंगराव थोरात (ओंड) सचिन कुमार आत्माराम पाटील (म्हासोली) धनाजी सदाशिव पाटील (उंडाळे) जगदीश बाळासाहेब निकम (शेरे),  महादेव आनंदा शिंदे (शिंदेवाडी) कोळेवाडी, विशाल दिनकर पाटील ( तुळसण) संपतराव दिनकरराव खबाले( विंग )सुशीला गुलाब सुतार (कराड) भागवत खाशाबा गओतपआगर ( कोडोली )काशिनाथ विठ्ठल कारंडे (टाळगाव ) जावेद मन्सूर फकीर (कोळे) यांचा नव्या संचालक मंडळात समावेश आहे नवीन संचालक मंडळाचे रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते उदयसिंह पाटील यांनी  स्वागत केले तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , कोयना बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील कोयना दूध संघाचे चेअरमन वसंतराव जगदाळे कराड तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय कदम    यासह  अनेकांनी नवीन संचालकांचे  अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment