Wednesday, July 5, 2023

पुणे जिल्ह्यात शरद पवारांना मोठा धक्का ; पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा अजित पवारांना पाठींबा; पुणे जिल्ह्यातील १३ पैकी १० तालुकाध्यक्ष अजित पवारांसोबत ;



वेध माझा ऑनलाईन। राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी अजित पवारांना पाठींबा दिला आहे. जिल्ह्यातील १३ पैकी १०  तालुकाध्यक्ष अजित पवारांसोबत असल्याची माहिती समोर येत आहे. मुळशी, पुरंदर आणि दौंडचे तालुकाध्यक्ष मात्र शरद पवारांसोबत असल्याची माहिती देखील समोर आली आहे

राष्ट्रवादी पुणे शहर कार्यालयाबाहेर पुणे पोलिसांचा बंदोबस्त
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर कार्यालयाबाहेर पुणे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.  नाशिकच्या घटनेनंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर आहेत.  कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुणे पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे.  राष्ट्रवादी कार्यालयाचा ताबा कुणी घेऊ नये, यासाठी शरद पवार गटाचे कार्यकर्ते अलर्टवर आहे.



No comments:

Post a Comment