वेध माझा ऑनलाईन। 95 ते 98 टक्के आमदारांचं आम्हाला पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार गटाचे उमेश पाटील यांनी केला आहे. कुठल्याही विचाराशी द्रोह केला नाही. 100 टक्के लोकांशी आम्ही संपर्क केल्याचे म्हणणे त्यांनी मांडले. आम्ही राष्ट्रवादी आणि आमचाच व्हीप असल्याचा दावा त्यांनी केला. अजित पवार यांच्या बंगल्यावरील बैठक संपली आहे. अजित पवार यांच्या गटाने राष्ट्रवादी पक्षावर दावा सांगितला आहे.
दरम्यान राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. चिन्ह आणि पक्षावर दोन्ही गटांनी दावा ठोकला आहे. चिन्ह आणि पक्ष आपले असल्याचा दावा दोन्ही गटांनी केला आहे. शरद पवार यांच्या गटानंतर अजित पवार यांच्या गटाने पण निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठावला आहे. निकाल देण्यापूर्वी आपले म्हणणे ऐकून घेण्याची विनंती अजित पवार यांच्या गटाने केली आहे.
No comments:
Post a Comment