Friday, July 7, 2023

अखेर इंद्रजित गुजर यांचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश ; मातोश्रीवर जाऊन बांधले शिवबंधन ; लवकरच कराडात येणार; उद्धव ठाकरेंचे गुजर यांना आश्वासन ;

वेध माझा ऑनलाईन। कराडचे नगरसेवक इंद्रजित गुजर यांनी आज मुंबईत मातोश्रीवर जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला याबाबत त्यांनी स्वतः वेध माझाला ही माहिती त्यामुळे आता इंद्रजित गुजर ठाकरे गटात प्रवेश कधी करणार याबाबतच्या चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे यातून कराडच्या राजकारणाचा नवीन अध्याय मात्र आता सुरू होणार का? हे देखील आता पहावे लागणार आहे 
दरम्यान इंद्रजित गुजर हे उद्धव ठाकरे गटात जाणार असल्याची चर्चा खूप दिवसापासून होती मात्र त्यांच्या कन्येचा विवाह सोहळा पार पडल्यानंतर ते काही दिवसानी पक्षप्रवेश करतील असे ऐकिवात होते  त्यांच्या कन्येचा विवाह नुकताच काही दिवसांपूर्वी सम्पन्न झाला आहे दरम्यान आज त्यांनी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे 


नगरसेवक इंद्रजित गुजर व अप्पा माने यांनी बऱ्याच दिवसापासून कराडमध्ये आपल्या स्वतंत्र गट निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत अप्पा माने हे काँग्रेसचे शहर अध्यक्ष होते त्यांना विश्वासात घेतले नाही आणि अचानक पदावरून हटवण्यात आले अशी भावना अप्पा मानेंसह बाबा गटातील अनेकांची झाली व त्यातून नाराजी पसरत ठाकरे गटाची एन्ट्री कराडच्या राजकारणात झाली अशी चर्चा आहे

दरम्यान, आज उद्धव ठाकरे यांनी स्वतः गुजर याना शिवबंधन बांधले त्यावेळी आपण लवकरात लवकर कराडात येणार आहोत आम्ही पूर्णपणे गुजर यांच्या पाठिशी आहोत असे आश्वासनही उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंनी गुजर याना दिले तब्बल अर्धातास मातोश्रीवर ठाकरेंनी गुजर यांच्याशी एकूणच राजकीय चर्चा करत कराडच्या राजकारणाचा आढावा घेतला संजय राऊत यांनी तुमचं कौतुक केलं आहे ,असेही ठाकरे गुजर याना म्हणाले 

दरम्यान गुजर यांच्या प्रवेशाने कराडमधील राजकीय समीकरणे बदलणार हे आता  नक्की आहे आ पृथ्वीराज चव्हाण यांना सोडून गेले असले तरी गुजर व त्यांचे सहकारी ठाकरे गटाच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे सदस्य म्हणून पुन्हा पृथ्वीराज बाबा यांच्यासह कराडात शरद पवार गटाबरोबर पालिका निवडणुकीत दिसणार आहेत ? अशी शक्यता आहे कराडात आता काँग्रेस राष्ट्रवादी भाजप तसेच शिंदे गटासाहित उद्धव ठाकरे सेनेची एन्ट्री झाली असल्याने पुढील समीकरणे यापूर्वीच्या झालेल्या राजकीय अनुभवावरून तसेच पुढच्या प्लॅनिंग ने शहरात घडतील व एकूणच या प्रत्येकाच्या राजकीय ताकदीचा कस पहायला मिळेल व त्यावरच मतदार कोणाला कल देतात हेही त्यांनतर स्पष्ट होणार आहे...तोपर्यंत वेट... अँड...वॉच...ची भूमिका करडकरांना घ्यावी लागणार आहे...


No comments:

Post a Comment