वेध माझा ऑनलाईन। उद्धव ठाकरे यांच्या गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासह दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शिवसेनेत सामिल होणार आहेत. आज दुपारी गोऱ्हे यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर अधिवेशनापासूनच याची सुरुवात झाली होती. उद्धव ठाकरे नागपुरात दाखल होताच, काही आमदारांनी नीलम गोऱ्हे यांची तक्रार केली होती. नीलम गोऱ्हे या उपसभापती असूनही आपल्याला बोलू देत नाहीत. आदित्य ठाकरेंच्या मुद्द्यावर ज्यावेळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरे गटाला घेरलं होतं. त्यावेळी उपसभापती म्हणून नीलम गोऱ्हे यांनी आपल्या आमदारांना बोलू द्यायला हवं होतं, असं आमदारांचं म्हणणं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरेंनीही नीलम गोऱ्हेंना खडे बोल सुनावले होते, अशी माहितीही समोर आली होती.
त्यानंतर नीलम गोऱ्हेंचा शिंटे गटाकडे ओढा वाढत गेला. मुख्यमंत्र्यांसोबतच्या कार्यक्रमांना त्या प्रोटोकॉल म्हणून उपस्थित असायच्या. तसेच, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी नीलम गोऱ्हेंच्या पुण्याच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच नीलम गोऱ्हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आज दुपारी नीलम गोऱ्हे शिवसेनेत प्रवेश करणार आहे. तसेच, नीलम गोऱ्हेंसह ठाकरे गटातील आणखी दोन पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
No comments:
Post a Comment