Tuesday, July 4, 2023

दोन-चार आमदार वगळले तर सगळे आमच्याच बाजूने ; शरद पवारच आमचे गुरू ; छगन भुजबळ यांचं वक्तव्य ;

वेध माझा ऑनलाईन। राष्ट्रवादी काँग्रेसवर अजित पवार यांनीही दावा सांगितला आहे. अशात शरद पवार यांनी पुन्हा एकदा पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असा सामना बघायला मिळतो आहे. अशात छगन भुजबळ यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. शरद पवार यांना आमदार भेटायला जात आहेत तर त्यात चुकीचं काय? दोन-चार आमदार वगळले तर सगळे आमच्याच बाजूने आहेत असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.दरम्यान शरद पवार हे आमचे गुरु आहेत अस छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. आज जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की अजित पवार यांच्यावर अन्याय झाला आहे का? त्यावर छगन भुजबळ म्हणाले बाकी सगळ्या गोष्टी स्टेजवर बोलू.

आणखी काय म्हणाले छगन भुजबळ?
“दोन-चार आमदार वगळले तर सगळे आमच्याच बरोबर आहेत. कार्यकर्तेही आमच्याच बाजूने आहेत. अजित पवारांना किती प्रतिसाद मिळतो आहे तुम्ही बघू शकता.” असंही भुजबळ म्हणाले. त्यावेळी त्यांना विचारण्यात आलं की काही आमदार हे सिल्वर ओकवर जात आहेत. त्यावर भुजबळ म्हणाले, “त्यात काय साहेबांनी बोलावलं तर जातात. मला बोलावलं तर मी पण जाऊन भेटून येईन.असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे

No comments:

Post a Comment