वेध माझा ऑनलाईन। आताची मोठी अपडेट समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. चिन्ह आणि पक्षावर दोन्ही गटांनी दावा ठोकला आहे. चिन्ह आणि पक्ष आपले असल्याचा दावा दोन्ही गटांनी केला आहे. शरद पवार यांच्या गटानंतर अजित पवार यांच्या गटाने पण निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठावला आहे. निकाल देण्यापूर्वी आपले म्हणणे ऐकून घेण्याची विनंती अजित पवार यांच्या गटाने केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसवर अजित पवार यांनीही दावा सांगितला आहे. अशात शरद पवार यांनी पुन्हा एकदा पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असा सामना बघायला मिळतो आहे.दरम्यान चिन्ह आणि पक्षावर दोन्ही गटांनी दावा ठोकला आहे.
No comments:
Post a Comment