वेध माझा ऑनलाईन। मसूरसह परिसरातील 16 गावांना वरदान ठरणाऱ्या हणबरवाडी – शहापूर उपसा जलसिंचन योजनेचे हक्काचे पाणी सोडले. पाण्यासाठी 18 ऑगस्टला मसूरला आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले होते. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी केलेल्या चर्चेनुसार व आश्वासनानुसार रस्ता रोको मागे घेण्यात आला होता. जिल्हा नियोजन समितीच्या सभेत 21 ऑगस्ट रोजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी मसूरच्या पूर्वेकडील गावात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असल्याची पालकमंत्र्यांना जाणीव करून दिली व दिलेल्या आश्वासनानुसार तात्काळ पाणी सोडण्यात यावे, अशी विनंती केली. अखेर आज पाणी विभागातल्या गावच्या शिवारात दाखल झाले.
यामुळे अंतवडी, रिसवड, मसूर यादववाडी, माळवाडी वाघेरी मेरवेवाडी वडोली निळेश्वर, शहापूर, करवडी, राजमाची, वनवासमाची, चिखली, किवळ व खोडजाईवाडी आदी 12 गावांमधील 2600 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. 900 मिमी व्यासाच्या पाईपलाईनद्वारे 3300 मि. लांबी 80 मि उंचीवर 495 एच.पी च्या 4 पंपाद्वारे पाणी उचलले जाणार आहे. या योजनेची सध्याची किंमत 101.40 कोटी इतकी आहे. या योजनेमध्ये उजवी बाजू गुरुत्वनलिका 25.54 किमी व डावी बाजू 22.27 किमी पाईपलाईनद्वारे व लघू वितरका पाईपलाईन सुमारे 59 किमीद्वारे शिवारात पाणी फिरणार आहे.
No comments:
Post a Comment