वेध माझा ऑनलाईन। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्याची त्यांच्या समर्थकांना भलतीच घाई झाली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून राज्याच्या विविध भागात यापुर्वीही अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेले बॅनर झळकले आहेत. आता धाराशिव जिल्ह्यात पुन्हा असे बॅनर लागल्यामुळे... विशेष म्हणजे याच बॅनरवर शरद पवार यांचा फोटो देखील आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत काका पुतण्याच नेमकं काय चाललंय ? अशा चर्चा यानिमित्ताने होत आहेत.
माझा फोटो परवानगी शिवाय वापरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा शरद पवारांनी संभाजीनगर, बीड दौऱ्यावर असतांना दिला होता. तर दुसरीकडे अजित पवार आमचे नेते आहेत, राष्ट्रवादीत फूट पडलीच नाही अशी विधान काल अनुक्रमे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी केली होती.त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं चाललय काय?या चर्चना आता उत आलेला दिसतो आहे
दरम्यान धाराशिवमध्ये अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेल्या बॅनरवर शरद पवारही झळकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
संघटनात्मक बांधणीसाठी धाराशिव जिल्ह्याची जबाबदारी राज्याचे क्रिडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांच्या हस्ते अजित पवार गटाच्या धाराशिवमधील कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. याच्या तयारीसाठी लावलेल्या बॅनरवर अजित पवारांना भावी मुख्यमंत्री करण्यात आले आहे. ते देखील शरद पवारांच्या साक्षीने याचीही चर्चा होत आहे
No comments:
Post a Comment