त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं चित्र काय आहे? मुळात राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आहे की नाही? यावर स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. राजकीय जीवनात वैचारिक भूमिका घेत असताना तुमच्यात मतमतांतरे असू शकतात. पण कुटुंब म्हणून तुमची वेगळी भूमिका असते. ही महाराष्ट्राची वर्षानुवर्षे चालत आलेली संस्कृती आहे, असं उत्तर अजित पवारांनी दिलं. ते एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या काय सुरू आहे? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “आता तुम्हाला जसं दिसतंय, त्यापद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचं काम सुरू आहे. प्रत्येकाला आपली मतं व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कुणी काय मत व्यक्त करावं? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. राजकीय जीवनात काम करताना तुम्ही वैचारिक भूमिका मांडू शकता. तुमच्यात मतमतांतरे असू शकतात. तुमची वेगवेगळी भूमिका असू शकते. पण कुटुंब म्हणून आपली भूमिका वेगळी असते. ही आपली वर्षानुवर्षे चालत आलेली संस्कृती आहे.”
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमके दोन गट आहेत की एकाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद आहेत? यावर अजित पवार पुढे म्हणाले, “हा प्रश्न निवडणूक आयोगाकडे गेला आहे. तिथे आम्ही आमची भूमिका मांडली आहे. येत्या काळात निवडणूक आयोग त्यासंदर्भात आपला निर्णय घेईल. आम्ही सगळ्यांनी बहुमताचा आदर करून जी भूमिका घेतली, ती भूमिका योग्य आहे, असं माझं मत आहे.” तुमच्याकडे सध्या किती आमदार आहेत? यावर अजित पवारांनी सांगितलं, “जेवढे आमदार बरोबर असणं गरजेचं आहे. तेवढे आमदार माझ्याबरोबर आहेत.”
No comments:
Post a Comment