वेध माझा ऑनलाईन। आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे अधिकृत फेसबुक पेज हॅक करण्यात आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही शिवेंद्रराजेंच्या समर्थकांनी केली आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरील ऍडमिनचा अॅक्सेस काढून घेतल्याचे निदर्शनास आलं त्यानंतर सदरचं पेज हॅक केल्याचं स्पष्ट झालं दरम्यान शिवेंद्रराजे भोसले यांचं फेसबुक पेज हॅक झाल्याचे समजताच त्यांच्या जनसंपर्क कार्यालयानं सातारा सायबर सेलकडं तक्रार दाखल केलीय. फेसबुक पेज हॅक झालं असल्याने कोणतीही अनाधिकृत पोस्ट पडल्यास त्याला हॅकर जबाबदार असेल, असे आमदार शिवेंद्रराजेंच्या जनसंपर्क कार्यालयानं म्हटलं आहे. कोणतीही पोस्ट पडल्यास कार्यकर्ते, शिवेंद्रराजे फॅन्स आणि नागरिकांनी त्यावर कसलीही प्रतिक्रिया देऊ नये, असं आवाहनही जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.
No comments:
Post a Comment