वेध माझा ऑनलाईन। चांद्रयान तीन ही मोहीम यशस्वीरित्या पार पडल्यानंतर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. यासोबतच आणखीन काही अंतराळ मोहीम इस्रो कडून राबवण्यात येणार आहेत. इस्रो कडून बऱ्याच वर्षांपासून मानव युक्त मोहिमेची पूर्वतयारी सुरू आहे. आता ही पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आलेली असून 2023 च्या अखेरीस किंवा 2024 च्या पहिल्या तिमाही मध्ये ही मोहीम राबवण्यात येईल.पीटीआय सोबत बोलत असताना इस्रोचे शास्त्रज्ञ एन रघु सिंग यांनी ही माहिती दिली.
त्यापैकी एक मोहीम ही अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था नासा सोबत करण्यात येणार आहे. यासोबतच इस्रोच्या गगनयान अंतर्गत तीन मोहिमांसोबतच बाकीच्या सहा मोहिमा राबवण्यात येणार आहे. त्यापैकी पहिला दोन मिशनमध्ये अंतराळवीर नसतील. तिसऱ्या मोहिमेमध्ये मात्र तीन अंतराळवीर असणार आहेत. मार्च 2024 पूर्वी ही मोहीम संपन्न केली जाईल असं सांगण्यात येत आहे.
या मानवयुक्त मोहिमेमध्ये तीन दिवसांसाठी या तिन्ही अंतराळवीरांना तळातील अंतराळात पाठवण्यात येणार आहे. त्याचबरोबर हे तिन्ही अंतराळवीर पृथ्वीपासून 400 किलोमीटर उंचीवरून सलग तीन दिवस गगनयान प्रदक्षिणा घालतील. त्यानंतर कृ मॉडेल यानापासून वेगळे करून पृथ्वीवर उतरवण्यात येतील. परंतु जेव्हा पहिल्या दोन मिशन यशस्वी होतील तेव्हाच या मानवयुक्त मोहिमा करता येऊ शकतात.
आतापर्यंत रशिया अमेरिका, चीन या तीन देशांना अंतराळात मानव युक्त मिशन राबवण्यासाठी यश मिळाले आहे. गगनयानाच्या मानव युक्त मोहिमेनंतर भारताचा देखील या यादीमध्ये समावेश होईल. यासोबतच भारत पुढच्या वर्षी चंद्रयान मोहीम ल्यूपेक्स लॉन्च करणार आहे. हा भारत आणि जपान चा संयुक्त उपक्रम असून पाण्याचे विश्लेषण हे या मिशनचे उद्दिष्ट असेल. त्याचबरोबर इस्रो सूर्य मंगळसूत्र या ग्रहावर देखील संशोधन करण्याची तयारी करत आहे.
No comments:
Post a Comment