वेध माझा ऑनलाइन। पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या तवेरा गाडीचा साताऱ्याजवळ टायर फुटल्याने भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 3 जण ठार झाल्याची घटना घडली. साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट नजीक आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवी मुंबईहून जयसिंगपूर कडे निघालेल्या तवेरा गाडीचा अचानक टायर फुटल्याने तवेरा गाडी समोर कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या बोलेरो पिकअपला धडकली.
मृतांमध्ये निखिल श्रीकांत सवाखंडे (वय- 30), प्रियांका निखिल सवाखंडे (वय- 32), शशिकांत यदुनाथ सव्वाखंडे (वय-63) यांचा समावेश आहे. तर इतर जखमींवर जिल्हा शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हे सर्व राहणार कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातल्या जयसिंगपूर येथील रहिवासी आहेत.
अपघात एवढा मोठा भीषण होता की यामध्ये तवेरा गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच सातारा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून घटनास्थळावरून अपघातग्रस्त गाड्या हटवल्या आहेत. या अपघाताची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे
No comments:
Post a Comment