Sunday, August 20, 2023

कराडच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये गंभीर स्वरूपाच्या आजाराच्या 42 बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाईन। कराडच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये हरनिया, जिभेवरील तसेच अंडाशयतील गंभीर स्वरूपाच्या आजाराच्या 42 बालकांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ. पारस कोठारी यांच्यासह त्यांच्या टीमने या यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. 

दरम्यान काही दुर्गम भागातील गावात अंगणवाडीतून आरोग्य सेविकामार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये जी बालके गंभीर स्वरूपाच्या आजारांनी ग्रस्त आढळून आली त्यांची येथील बालरोगतज्ञांच्या मार्फत तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्या बालकांवर उपचार करण्यासाठी मुंबईच्या सायन हॉस्पिटलमधील डॉ. पारस कोठारी यांच्या टीमला कराड येथे बोलवण्यात आले. त्यांनतर मुंबईतील सायन हॉस्पिटलचे बाल चिकित्सक डॉ. पारस कोठारी यांच्यासह डॉ. संजय ओक, डॉ. शहाजी देशमुख, डॉ. मैत्री सावे, डॉ. ऑन्ड्री पायस, भूलतज्ञ डॉ. अंकेष झुनझुनवाला, डॉ. आकृती प्रभू, डॉ. अक्षता पवार, स्टाफ विदुला मजनी, कुमुल खडपे तसेच कराड येथील उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. राजेश शेडगे, डॉ. प्रशांत देसाई यांच्यासह रुग्णालयातील को ओर्डीनेटर श्रीमती कुमुत खडपे यांच्या प्रयत्नाने एकूण 42 शस्त्रक्रिया झाल्या.

 

No comments:

Post a Comment