Thursday, August 17, 2023

सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याला ब्राझीलच्या पाहुण्यांनी दिली भेट ; संचालकांनी केला परदेशी पाहुण्यांचा सन्मान ;

वेध माझा ऑनलाईन। यशवंतनगर ता.कराड येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याला ब्राझील देशातून आलेल्या जनरल चेन्स डो या कंपनीचे कमर्शियल डायरेक्टर श्री. मार्सिओ, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे मुख्य ऊस सल्लागार डॉ. आर. बी. डौले यांनी भेट देऊन पाहणी केली. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या सहकार्याने दौऱ्याचे आयोजन केले होते. दौऱ्यात पाहुण्यांनी कारखान्यातील कार्यरत यंत्रणेची पाहणी केली. त्यानंतर संचालक मंडळाबरोबर बैठक झाली यावेळी पाहुण्यांचा सत्कार माननीय संचालकांच्या हस्ते शाल, फेटा व पुष्पगुच्छ देऊन झाला.स्वागत व प्रास्ताविक कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी केले.

यानंतर ब्राझीलचे श्री. मार्सिओ म्हणाले की, शेतात ऊस तोडणी होऊन थेट कारखान्यात गाळप केला जातो. ब्राझीलने विकसीत केलेल्या तंत्रज्ञानानुसार गाळप करण्यापूर्वी ऊसाबरोबर येणारी माती व पाला स्वच्छ केल्यास प्रतिटन अर्धा टक्का उतारा वाढतो. शिवाय खर्चही जास्त येत नाही. जुन्या तंत्रज्ञानाने माती व पाला रासातून काढण्याची खर्चीक पद्धत आहे. याबाबत त्यांनी सचित्र माहिती दिली. दुभाषिक प्रदीप तावडे यांनी श्री. मार्सिओ देत असलेली माहिती मराठीमध्ये संचालक मंडळाला सांगितली.

यावेळी कारखान्याचे संचालक मानसिंगराव जगदाळे, कांतीलाल पाटील, लालासाहेब पाटील, माणिकराव पाटील, अविनाश माने, डी.बी.जाधव, पांडुरंग चव्हाण, पै.संजय थोरात, रामदास पवार, वसंतराव कणसे, सर्जेराव खंडाईत, रामचंद्र पाटील, संजय कुंभार, संचालिका सौ.शारदा पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, अधिकारी, कर्मचारी उपस्‍थित होते.

No comments:

Post a Comment