Sunday, August 13, 2023

पोलिस असल्याचे सांगून सोने केले लंपास ; कराडच्या पालिका शाळा क्रमांक 3 समोर घडली घटना ; चोर सीसीटीव्ही मध्ये कैद ;

वेध माझा ऑनलाइन। आम्ही पोलीस आहोत असे सांगून एका  वृद्ध महिलेकडील अंदाजे दोन तोळ्याचा सोन्याचा ऐवज लंपास करण्यात आला. कराडमधील नगरपालिका शाळा क्रमांक तीन च्या परिसरात रविवारी सकाळी १० वाजता ही घटना घडली. निर्मला मोहन पवार रा. शुक्रवार पेठ यांनी याबाबतची फिर्याद पोलिसात दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निर्मला पवार या रविवारी सकाळी नवकला चौकात भाजीपाला खरेदी करून त्या पायी चालत घराकडे निघाल्या होत्या. त्यावेळी पालिका शाळा क्रमांक तीनसमोर दोघेजण उभे होते. आम्ही  साध्या वेशातील पोलीस आहोत. तुम्ही गळ्यात दागिने घालून फिरु नका. दागिने चोरीला जातील,असे त्यांनी निर्मला पवार यांना सांगीतले गळ्यातील सोन्याची माळ काढून आमच्याकडे द्या,आम्ही तुम्हाला ती पुडीत बांधून देतो,असेही ते म्हणाले निर्मला पवार यांनी गळ्यातील माळ काढून त्यांच्या हातात दिली. 
त्यानंतर त्या दोघांनी कागदाच्या पुडीत माळ बांधून देण्याचा बहाणा करीत ती पुडी भाजीपाल्याच्या पिशवीत टाकली. निर्मला पवार यांनी पुडी उघडून पाहिले असता त्यामध्ये लहान खडे असल्याचे दिसले त्या दरम्यान ते दोघेही तिथून पसार झाले होते

No comments:

Post a Comment