Wednesday, August 23, 2023

उपराकार लक्ष्मण मानेंनी सातारच्या सर्किट हाऊसच्या पायऱ्यांवर बसून काय केलं ?

वेध माझा ऑनलाईन। उपराकार लक्ष्मण माने यांना साताऱ्यातील सर्किट हाउसमध्ये पत्रकार परिषद घ्यायला कर्मचाऱ्यांनी मनाई केल्यानंतर लक्ष्मण माने भडकले आणि सर्किट हाऊसच्या पायऱ्यांवरच त्यांनी ठिय्या मांडला

‘उपराकार’ लक्ष्मण माने हे विधान परिषदेचे माजी आमदार आहेत. त्याचबरोबर प्रसिद्ध लेखक, साहित्यिक आहेत. त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने त्यांचा सन्मान केला आहे त्यांना सातारच्या शासकीय विश्रामगृहात एका महत्वाच्या विषयावर पत्रकार परिषद घ्यायची  होती. मात्र, नियम दाखवून त्यांना पत्रकार परिषद घेण्यास मनाई करण्यात आली.दरम्यान लक्ष्मण माने यांनी सर्किट हाऊस च्या पायऱ्यांवर बसूनच पत्रकार परिषद घेतली. भटक्या-विमुक्तांना लोकसभा आणि विधानसभेत प्रतिनिधित्व मिळावे, या मागणी संदर्भात त्यांची पत्रकार परिषद होती.
विधान परिषदेचे माजी आमदार आणि पद्मश्री पुरस्कार व्यक्तीला पत्रकार परिषद घेण्यास रोखल्याने लक्ष्मण माने चांगलेच भडकले होते. साताऱ्यात पुन्हा ब्रिटिश आलेत काय? असा सवाल त्यांनी केला. मी इथेच बसतो म्हणत ते सर्किट हाऊसच्या पायऱ्यांवरच बसून राहिले


No comments:

Post a Comment