वेध माझा ऑनलाईन। पाऊस नसल्याने कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडत चालले आहे. सांगली, कुपवाड शहरासाठी आठ दिवस उपसा होईल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे सांगली महापालिकेने केलेल्या विनंतीनुसार कोयना धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.
सध्या पिण्याच्या पाण्याची परिस्थिती बिकट बनल्याने कोयना धरणातून पाणी सोडण्याची विनंती सांगली महापालिकेकडून पाटबंधारे विभागाला करण्यात आल्यानंतर शनिवारी कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातील एक युनिट कार्यान्वित करून १०५० क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे.दरम्यान कृष्णा नदीचे पात्र पडले कोरडे पडत चालले असल्याची सध्यस्थिती आहे सांगली, कुपवाड शहराला आठवडाभर पाणी पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे कोयना धरणातून पाणी सोडण्याची विनंती सांगली महापालिकेने पाटबंधारे विभागाला केली होती.त्यानुसार पाणी सोडण्यात आले दरम्यान सध्या कोयना धरणात ८५ टीएमसी इतका पाणीसाठा आहे
No comments:
Post a Comment