वेध माझा ऑनलाईन । महिलांना उद्योग देऊन त्यांच्या हाताला काम देत त्यांना स्वावलंबी करणाऱ्या भोसले कुटुंबाचे काम खूप मोठे असल्याचे विधान भाजप महिला आघाडीच्या राज्याच्या अध्यक्षा सौ चित्रा वाघ यांनी आज कराडमध्ये व्यक्त केलं
कृष्णा नागरी महिला पतसंस्थेच्या ओगलेवाडी शाखेचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनतर टाऊन हॉल येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या
त्या पुढे म्हणाल्या महिलांना सक्षम होण्यासाठी त्यांनी आर्थिक सक्षम होणे गरजेचे आहे महिला समर्पणाची भावना बाळगते त्यामुळेच केवळ समाज उन्नत होतो सामाजिक कार्यात महिलेला केंद्र बिंदू मानून अनेक योजना कार्यान्वित सध्या सरकारकडून होत आहेत याचनिमित्ताने महिलांना सक्षम करण्यासाठी भाजप सरकारचे प्रयत्न नेहमीच होताना दिसत आहेत
महिलांच्या 50 टक्के मतदानातुन कोणी निवडून यायचं हे आपण ठरवू शकतो ही महिलेची ताकद आहे यापूर्वी महिलेच्या अधिकारांचा कोणत्या सरकारने विचार केला नाही फक्त मोदी सरकारने महिलांच्या सन्मानासाठी प्रयत्न चालू ठेवला आहे कोविडच्या काळात भाजपने जनधन योजनेच्या माध्यमातून महिलेच्या खात्यात 500 रुपये पाठवले गेले वॅक्सिंग ची मोठी उपलब्धता देशात व इतर संबंधित देशाला करून दिली आमच्या सरकारने घराघरात नळ व नळाला पाणी या बाबी देऊन महिलेच्या डोक्यावरचा हंडा बाजूला ठेवला आहे रेशन मोफत प्रवास आरोग्य योजना शिक्षण उद्योग योजना याबरोबरच सर्वच महिलांसाठी असणाऱ्या योजनांची त्यांनी यावेळी माहिती दिली
त्या म्हणाल्या महिलेवर अत्याचार होत असताना पक्ष कोणता हे मी बघत नाही जिथे महिलांवर अत्याचार झाले तिथे मी उभे असते यापूर्वीचे सरकारच्या काळात महिलेला न्याय मिळण्यासाठी दिरंगाई व्हायची पण सध्याच्या काळात लगेच महिलेला न्याय मिळतो हा फरक आहे तसेच महिलेला आपल्या अधिकारासाठी सजग रहाव लागेल महिलांनी महिलांसाठी मदतीसाठी उभंही राहावं लागेलं हेही लक्षात ठेवा असा सलाही त्यांनी उपस्थित महिलांना दिला महिलांच्या अत्याचारांवर न्याय मिळण्यासाठी एक्सक्लुजीव कोर्ट पाहिजे ही माझी मागणी आहे लवकरच ती पूर्णही होईल ही खात्री आहे जर यापुढे अज्ञान महिलेवर अत्याचार झाले तर त्याला मृत्युदंड होणार अशी तरतूद होणारा कायदा लवकरच येणार असल्याचे महत्वाचे विधान सौ चित्रा वाघ यांनी आज येथे केले यावेळी उपस्थित महिलांनी प्रचंड टाळ्या वाजवून प्रतीसाद देत घोषणाही दिल्या
दरम्यान यावेळी डॉ अतुल भोसले व डॉ सुरेश भोसले यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना एकूणच कृष्णा उदयोग समूहातील सर्व संस्था विशेष करून महिला संस्थांच्या कामकाजाची सविस्तर व सर्वदूर माहिती दिली तसेच डॉ अतुलबाबा यांनी विशेष करून सरकारच्या अनेक धोरणांची व यशस्वी योजनांची माहितीही यावेळी दिली
No comments:
Post a Comment