वेध माझा ऑनलाईन ; काय डोंगार… काय झाडी… या डायलॉगमुळे राज्यात प्रसिध्दीस आलेले शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा तालुक्यात सततची दुष्काळी परिस्थिती त्यातच यंदा पावसाने दडी मारल्याने खरिपाचा हंगाम वाया गेला. त्यामुळे तालुक्यातील शेतकरीवर्ग आता चिंतेत आहे. बापूंनी आमदार झाल्यानंतर विकासकामांसाठी तालुक्यात तसा बक्कळ निधी नेला आहे. मात्र तालुक्याचा पाणीप्रश्न मात्र सुटलेला नाही. त्यामुळे तालुक्यातील मतदार आता बापूंवर कमालीचा नाराज झाला आहे.
यंदा मोसमी पावसाने टांग दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी चिंताग्रस्त आहे. सांगोला तालुक्यात दुष्काळी चिन्हे दिसत असातना नीरा उजवा फाटा क्रमांक आठला मात्र अद्याप पाणी मिळालेले नाही. नियमाने ‘टेल टू हेड’ असे पाणी वाटप होणे अपेक्षित असताना देखील हे लाभक्षेत्र पाण्यापासून का वंचित आहे, असा सवाल शेतकरी करत आहेत.
एकीकडे बापूंनी सांगोला उपसा सिंचन योजना मार्गी लावण्याचा जोरदार प्रयत्न सुरु केला आहे. परंतू पावसाअभावी आता खरिप हंगाम वाया गेल्याची परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या ती पिके आता करपून जाण्याच्या स्थितीत आहेत. निरा उजव्या कालव्याच्या फाट्याला पाणी सुटेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र अद्याप या कालव्याला पाणी न सुटल्याने ‘बापू निधी नको आता पाणी द्या’ अशी मागणी शेतकरी करु लागले आहेत.
No comments:
Post a Comment