Tuesday, August 22, 2023

भिकाऱ्यांना कौशल्य विकासाचे धडे दिले जाणार ; आता भिकारीही होणार स्वावलंबी ;

वेध माझा ऑनलाईन । मुंबई असो वा देशातील कोणत्याशी शहरात भिकारी आपल्याला हमखास दिसतात. दिवसभर भीक मागून ते रात्री फुटपाथ वा मिळेल तो आडोसा शोधत तिथे राहतात. सार्वजनिक प्रसाधन गृहाचा वापर ते करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ट्रिलियन (पाच लाख कोटी) डॉलर्स अर्थ व्यवस्थेचे ध्येय गाठण्याचे ठरवले असताना भारतात भिकाऱ्यांची समस्या गंभीर आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई त्यातून सुटलेली नाही. भिकारी निर्मूलन व्हावे यासाठी सरकारने अनेक योजना आणल्या. पण त्या कागदावरच पूर्ण झाल्या आहेत. काही स्वयंसेवी संस्थाही भिकाऱ्यांसाठी काम करत असतात. असे असताना आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी भिकाऱ्यांना स्वावलंबी करण्याचे ठरवले आहे. यासाठी कौशल्य विकासाचे कार्यक्रम राबविण्याचे निर्देश तटकरे यांनी प्रशासनाला दिले.

चेंबूर येथील शासकीय पुरुष आणि महिला भिक्षेकरीगृह आणि मानखुर्द येथील दि चिल्ड्रेन्स एड होम, मुले तसेच मुलींचे नवीन बालगृह , गतिमंद मुलांसाठीचे बालगृह, चिल्ड्रेन्स एड सोसायटीची प्राथमिक व माध्यमिक शाळा यांना आदिती तटकरे यांनी अलीकडेच भेट देऊन तिथे देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधा, अन्न-धान्याची गुणवत्ता, स्वयंपाकाच्या ठिकाणी असणारी स्वच्छता तसेच बालकांच्या सुरक्षिततेबाबत पाहणी केली. तिथे तयार करण्यात आलेल्या जेवणाची चवही चाखून तिची गुणवत्ता त्यांनी तपासली.भिकारी प्रवृत्तीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना केल्या जाव्यात, भिक्षेकरीगृहातील महिला व पुरुषांना स्वावलंबी करण्यासाठी कमी कालावधीचे कौशल्य विकासाचे कार्यक्रम राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रशासनाला दिले. 

भिक्षेकरी प्रवृत्तीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना केल्या जाव्यात, भिक्षेकरीगृहातील महिला व पुरुषांना स्वावलंबी करण्यासाठी कमी कालावधीचे कौशल्य विकासाचे कार्यक्रम राबविण्याचे निर्देश मंत्री कु. तटकरे यांनी प्रशासनाला दिले. 

No comments:

Post a Comment