Sunday, August 20, 2023

कराडच्या समस्त ब्राह्मण समाज सामाजिक संस्थेच्या वतीने ''श्रावणी संस्कार" कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ;

वेध माझा ऑनलाईन। कराडच्या समस्त ब्राह्मण समाज सामाजिक संस्थेच्या वतीने सर्व शाखीय ब्राह्मण वृंदासाठी रविवार दि 20 रोजी ''श्रावणी संस्कार" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अनेक ब्रह्मवृंदांनी
 या उपक्रमात आपला सक्रिय सहभाग नोंदवला जुने कृष्णाबाई मंगल कार्यालय याठिकाणी हा कार्यक्रम सकाळी ८.०० ते ११.०० या वेळेत पार पडला
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रत्येकाने आपल्या नावाची नोंदणी याठिकाणी केली होती विधिवत पद्धतीने व मंत्रोच्चारासह हा कार्यक्रम शास्त्रशुद्ध पद्धतीने पार पडला. सलग 3 तास हा कार्यक्रम धार्मिक अधिष्ठानपूर्वक सुरू होता या कार्यक्रमाचे संचालन ओंकार आपटे आणि संजय पाठक गुरूजी यांनी केले. 
सदर कार्यक्रमास जयंत बेडेकर, श्रीकांत ढवळे,  पंडितराव देशपांडे डॉ सुहास कुलकर्णी,श्री पेंढारकर,मोहन आरे, अवधूत कुलकर्णी विनय टोणपे तसेच बहुतांशी ब्रह्मवृंद यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment