वेध माझा ऑनलाईन। कराड नगरपालिका शाळा क्रमांक 9 मध्ये स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. सीमा पुरोहित आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.कविता थोरवडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले दरम्यान स्वातंत्र्य दिनानिमित्त इनरव्हील क्लब ऑफ कराडच्या वतीने नगरपालिका शाळा क्रमांक 9 मधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अरविंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांची मनोगतेही यावेळी सादर करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. अर्चना मुंढेकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा नंबर 9 मधील शिक्षक सौ.लतादेवी कारंडे,सौ. नीलिमा पाटील, सौ.लक्ष्मी पवार, सौ.नाजनीन पठाण,श्रीम.अमिता खंदारे, श्री.नितीन कापरे,श्री. दिगंबर शेटे,श्री.संजय टाळकुटे यांनी विशेष सहकार्य केले यावेळी, इनर व्हील क्लब ऑफ कराडच्या सचिव डॉ. सौ.अर्चना औताडे, माजी अध्यक्षा सौ.रुता चाफेकर, सौ. नम्रता कंटक तसेच विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
No comments:
Post a Comment