Sunday, August 20, 2023

"त्या' आत्महत्या प्रकरणात मंत्री शंभुराज देसाईंचे नाव? धनंजय ननावरे यांनी ऑन कॅमेरा आपले बोट छाटून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले ; काय आहे बातमी ...?

वेध माझा ऑनलाईन ।  दिवंगत माजी आमदार ज्योती कलानी यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार ननावरे यांनी 1 ऑगस्टला पत्नीसह राहत्या बंगल्याच्या गच्चीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेच्या २० दिवसांनंतरही पोलिसांकडून चौकशीत दिरंगाई केली जात असल्याने नंदकुमार ननावरे यांचे बंधू धनंजय ननावरे यांनी ऑन कॅमेरा आपले बोट छाटून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील आत्महत्या केलेल्या नंदकुमार ननावरे यांचे बंधू धनंजय ननावरे यांनी आपले बोट छाटून त्याचा व्हिडीओ तयार करत तो थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविला आहे. ननावरे यांनी थेट जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा उल्लेख केला असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी चौकशी व पुढील तपास जलद गतीने केला जात नसल्याने यापुढे रोज शरीराचा एक अवयव तोडून तो गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविणार असल्याचा इशारा धनंजय ननावरे यांनी व्हीडिओमधून दिला आहे. याप्रकरणी पोलिसानी काही जणांना अटक केली आहे असे समजते
दरम्यान,या प्रकारावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री फडणवीस यांनी देसाईंना झापल्याचेही समजते 

No comments:

Post a Comment