Sunday, August 13, 2023

शरद पवारांनी अजित पवारांशी भेट झाल्याचं नाकारले नाही ; म्हणाले...अजित पवार माझा पुतण्या आहे,आमचे भेटणे चर्चेचा विषय नको ;

वेध माझा ऑनलाइन । अजित पवार हा माझा पुतण्या आहे आणि मी पवार कुटुंबात सर्वात वडीलधारी व्यक्ती आहे त्यामुळे मला भेटायला कोणी कुटुंबातील व्यक्ती आली तर तो चर्चेचा विषय होऊ नये असे स्पष्टीकरण शरद पवारांनी आज माध्यमांशी बोलताना दिले मात्र आपली अजित पवारांबरोबर भेट झाल्याचे पवारांनी यावेळीं नाकारलेही नाही

शनिवारी अजित पवारांनी शरद पवारांची गुप्त बैठक घेतली होती आणि माध्यमांनी ती भेट उघड करून टी व्ही चॅनेल वरून संपूर्ण महाराष्ट्रपुढे आणली होती त्यावेळी अजित पवार माध्यमांपासून लपण्यासाठी गाडीतून अक्षरशः झोपून गेल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले होते या सर्व घटनेबाबत आज शरद पवार यांनी आपले स्पष्टीकरण दिले त्यावेळी मात्र आपली अजितदादांशी भेट झाल्याचे त्यांनी मान्यच केले आपण निवडणूक आयोगाला आमचा पक्ष फुटला नसल्याचे सांगितले आहे असे देखील ते यावेळी म्हणाले

 ते पुढे म्हणाले ...राष्ट्रवादी चा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे भाजप बरोबर असोसिएशन करणे आमच्या तत्त्वात बसत नाही आमचे काही सहकारी त्यांच्या बरोबर गेले आहेत त्यांना पुन्हा आमच्याकडे आणण्याचे आमच्या हितचिंतकांचे प्रयत्न चालू आहेत त्यासाठी ते संवाद करत आहेत

पंतप्रधान मोदी हे अद्याप मणिपूर या विषयावर समाधानकारक बोलले नसल्याचे सांगून पवार म्हणाले ईडी सारख्या यंत्रणांचा वापर भाजप कडून विरोधकांचे धैर्य खचवण्यासाठी होत आहे 
मी उद्धव ठाकरे व नाना पटोले यांनी बोलावलेली
'इंडिया ' आलायन्सच्या नेत्यांची बैठक 1 सप्टेंबर ला होईल त्या अगोदर मुंबईमध्ये 31 ऑगस्ट ला देखील ही बैठक होणार असल्याचे पवार म्हणाले त्यावेळी "इंडिया ' चा अजेंडा ठरण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली त्यासाठी ही बैठक महत्वाची असल्याचेही ते म्हणाले 
मुख्यमंत्री शिंदे यांच्या जिल्ह्यात एका रुग्णालयात 17 जण एका रात्री दगावले ही बाब अत्यंत गंभीर आहे मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही अवस्था तर हे राज्य कसे चालवणार...असा सवाल देखील शरद पवारांनी यावेळी केला... नवाब मलिक यांची अद्याप आपल्याशी भेट झाली नसल्याचेही ते यावेळी म्हणाले...

No comments:

Post a Comment