Sunday, August 20, 2023

येत्या 22 तारखेला पाणी सोडले जाणारच होते... तसे नियोजनही झाले होते ; आमदार बाळासाहेब पाटील यांचे आंदोलन म्हणजे प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट ; भाजप नेते मनोजदादा घोरपडे यांची टीका ;

वेध माझा ऑनलाईन।  गेली पंचवीस वर्षे सत्ता भोगून विद्यमान आमदारांना रस्त्यावर बसण्याची वेळ आली कराड उत्तरची जनता यांना कायमचेच रस्त्यावर बसवल्याशिवाय राहणार नाही. मसूर येथे केलेलं आंदोलन म्हणजे केवळ दिखावा आहे येणाऱ्या 22 तारखेला पाणी सोडले जाणार होतेच तसे नियोजनच झाले होते, प्रसिद्धीसाठी एक स्टंट म्हणून हे आंदोलन केले गेले यातून जनतेची फसवणूक केली गेली असा टोला भाजपाचे व कराड उत्तरचे नेते मनोजदादा घोरपडे यांनी लगावला.

पालकमंत्री शंभूराज देसाई व रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांच्या प्रयत्नातून नलवडेवाडी ता. कोरेगाव येथे 18 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन कराड उत्तरचे भाजपा नेते मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी भीमराव पाटील व वासुदेव माने यांनीही आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर टीका केली ते म्हणाले,यावेळी कराड उत्तर मध्ये एकास एक उमेदवार देऊन आमदारांना कायमच घरी बसवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागा आमदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून  निधी आणून विकासकामांचा डोंगर याठिकाणी उभा करणार असलयाचेही ते म्हणाले 

याप्रसंगी पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब निकम, संपतराव माने, सरपंच महादेवराव नलावडे, विकास सोसायटीचे चेअरमन राजू नलवडे, महीपती यादव, दिनकर नलवडे, गुलाब वाघ, प्रशांत निकम, सुरज चव्हाण, वाठार किरोलीचे सरपंच सुनील कांबळे, उपसरपंच ज्ञानदेव गायकवाड प्रल्हाद जाधव, जगन्नाथ नलवडे, बाबुराव नलवडे महेश उबाळे संचालक विक्रमबाबा कदम आदी मान्यवर उपस्थित होते..

No comments:

Post a Comment