Sunday, August 27, 2023

चांद्रयान ३ च्या यशात कराड तालुक्यातील काले गावच्या प्रवीण कुंभारचा मोठा वाटा ;

वेध माझा ऑनलाईन।  भारताने चांद्रयान 3 मोहीम फत्ते करून नवा इतिहास रचला चांद्रयान ३ च्या या यशात कराड तालुक्यातील काले येथील प्रवीण कुंभार यांचाही मोठा हातभार आहे. प्रवीण कुंभार हे सध्या इस्रो स्पेस अॅप्लिकेशन सेंटर अहमदाबाद येथे मायक्रोवेव्ह पेलोड मेकॅनिकल विभागात कार्यरत आहे.

 प्रवीण भीमराव कुंभारने 2014 साली द्वितीय क्रमांकाने’ उत्तीर्ण होऊन “मशीन डिझायनर-B” म्हणून त्याची निवड झाली होती. प्रवीणने चांद्रयान ३ च्या का-बँड अल्टिमीटरच्या सेन्सर प्रणालीच्या यांत्रिक रेखाचित्रात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे चांद्रयान मोहिमेत काले गावच्या प्रवीणचा महत्वाचा वाटा  आहे.

इस्रोमध्ये काम करत असताना अनेक दिग्गज शास्त्रज्ञांना भेटण्याची आणि त्यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली. चांद्रयान ३ विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरचे यशस्वी लँडिंग हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे. चांद्रयान ३ च्या यशस्वी लँडिंगनंतर, त्याठिकाणी काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी आनंद साजरा केला आणि एकमेकांना मिठी मारली अशी प्रतिक्रिया प्रवीण कुंभार यांनी दिली. 

No comments:

Post a Comment