वेध माझा ऑनलाइन । शरद पवारांच्या बीड जिल्ह्यातील सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी अजित पवार यांची होणारी सभा रद्द होणार, अशा चर्चा होत्या. पण मंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची सभा होणार असल्याची माहिती दिली आहे. धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत अजित पवार यांची बीडमध्ये 27 ऑगस्ट रोजी उत्तर सभा होणार असल्याची माहिती दिली आहे. बीडमधील सभेमध्ये शरद पवारांनी धनंजय मुंडे आणि अमरसिंह मुंडे या अजित पवरांच्या गटातील नेत्यांवर जोरदार टीका केली होती. 27 तारखेला होणाऱ्या उत्तर सभेतून धनजंय मुंडे अथवा अजित पवार काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
धनंजय मुंडे यांनी काय केले ट्वीट -
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड येथे दिनांक 27 ऑगस्ट रोजी जाहीर सभा होणार असून या सभेला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत. ही सभा रद्द झाल्याबाबत माध्यमांवर येणाऱ्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या असून माध्यम प्रतिनिधींनी कृपया खात्री केल्याशिवाय सभेबद्दल अशा चुकीच्या व निराधार बातम्या देऊ नयेत, ही विनंती, असे ट्वीट धनंजय मुंडे यांनी केलेय.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड येथे दिनांक 27 ऑगस्ट रोजी जाहीर सभा होणार असून या सभेला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत.
No comments:
Post a Comment