Saturday, August 26, 2023

कराडात तब्बल 17 लाखाची चोरी ; जालिंदर रैनाक यांची पोलिसात तक्रार ;

वेध माझा ऑनलाईन।  तब्बल सतरा लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना शहरातील वाखाण रोडलगत पी. डी. पाटील पार्क इमारतीत घटना घडली आहे  जालिंदर यशवंत रैनाक यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराडात वाखाण रोडलगत पी. डी. पाटील पार्क इमारतीत जालिंदर रैनाक हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांनी पत्नीसाठी बारा तोळे वजनाचे मंगळसूत्र, बारा तोळे वजनाचे सोन्याचे तोडे, तेरा तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, दीड तोळे वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या बनवल्या होत्या. त्याबरोबरच त्यांनी स्वत:साठी चार तोळे वजनाची सोन्याची चैनही बनवली होती. हे दागिने त्यांनी कपाटातील लॉकरमध्ये ठेवले होते. दि. 22 रोजी जालिंदर रैनाक यांनी कपाट उघडले असता कपाटातील दागिन्यांची पिशवी त्यांना दिसली नाही. दरम्यान, दि. 20 रोजी सकाळी अंगठी शोधण्यासाठी लोखंडी कपाट उघडून त्यातील दागिने असलेली पिशवी आपण बाहेर काढली होती, हे जालिंदर रैनाक यांना आठवले. तसेच पिशवी पुन्हा कपाटात न ठेवता ती खालीच ठेवून कपाट बंद केल्याचेही त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे अज्ञाताने घरात घुसून सोन्याचे दागिने असलेली पिशवी लंपास केल्याचे स्पष्ट झाले. जालिंदर रैनाक यांनी याबाबतची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. 

No comments:

Post a Comment