दीपक सांगवान यांनी काही पैशांच्या बदल्यात अमनदीप सिंग धल्ल यांना अटकेपासून वाचवण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन दिले होते. प्रवीण वत्स यांनी डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत अमनदीप धल्ल यांच्याकडून प्रत्येकी ५० लाख रुपयांच्या सहा हप्त्यांमध्ये यांच्याकडून ३ कोटी रुपये घेतले असे प्रवीण वत्स यांनी ईडीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे त्यानंतर दोन कोटी रुपये दिल्यास तुमचे नाव आरोपींच्या यादीतून वगळले जाईल, असे आश्वासन त्यांनी धल्ल यांना दिले. अमनदीप धल्ल यांनी सांगवान यांची ही मागणीही पूर्ण केली. मात्र, सांगवान यांनी आश्वासन दिल्यानंतरही ईडीने अमनदीप धल्ल यांना १ मार्च २०२३ रोजी अटक केली. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला संस्थेतील काही अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याचे पुरावे सापडले झडती दरम्यान, प्रवीण वत्स यांच्या निवासस्थानी २.१९ कोटी रुपये रोख आणि १.९४ कोटी रुपये किमतीचे हिऱ्यांचे दागिने सापडले. याशिवाय त्यांच्या बँक खात्यात २.६२ कोटी रुपये सापडले.
Tuesday, August 29, 2023
सीबीआयकडून 'ईडी'च्या अधिकाऱ्याला ५ कोटींची लाच घेतल्याप्रकरणी अटक :
वेध माझा ऑनलाईन। दिल्ली दारू धोरण प्रकरणात सीबीआयने 'ईडी'च्या एका अधिकाऱ्याला ५ कोटींची लाच घेतल्याप्रकरणी अटक केली आहे. 'ईडी'मध्ये सहाय्यक संचालक म्हणून काम करणार्या पवन खत्री यांनी या प्रकरणातील आरोपी व्यापारी अमनदीप सिंग धल्ल यांच्याकडून ५ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. तपासानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. ईडीच्या तक्रारीनुसार, अमनदीप सिंग धल आणि बिरेंद्र पाल सिंग यांनी दारू पॉलिसी प्रकरणात चालू असलेल्या तपासात आरोपींना मदत करण्यासाठी डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ दरम्यान प्रवीण वत्स यांना ५ कोटी रुपये दिले होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment